नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी २१ राज्यांमधील एकूण १०२ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे:
तामिळनाडू : राज्यातील सर्व ३९ जागा
राजस्थान: २५ पैकी बारा जागा
उत्तर प्रदेश: ८० पैकी आठ जागा
मध्य प्रदेश: २९ पैकी सहा जागा
महाराष्ट्र: ४८ पैकी पाच जागा (चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक, आणि नागपूर)
उत्तराखंड: राज्याच्या सर्व पाच जागा
आसाम: १४ पैकी पाच जागा
बिहार: ४० पैकी चार जागा
पश्चिम बंगाल: ४२ पैकी तीन जागा
अरुणाचल प्रदेश: राज्याच्या दोन जागा
मणिपूर : राज्याच्या दोन जागा
मेघालय: राज्याच्या दोन जागा
छत्तीसगड: राज्याच्या ११ जागांपैकी एक
मिझोराम: राज्याची एकमेव जागा
नागालँड: राज्याची एकमेव जागा
सिक्कीम: राज्याची एकमेव जागा
त्रिपुरा: राज्यातील दोनपैकी एक जागा
जम्मू आणि काश्मीर: पाच जागांपैकी एक जागा
अंदमान आणि निकोबार बेटे: केंद्रशासित प्रदेशाची एकमेव जागा
लक्षद्वीप: केंद्रशासित प्रदेशाची एकमेव जागा
पुद्दुचेरी: केंद्रशासित प्रदेशाची एकमेव जागा
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ९७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांचे भवितव्य ९५ लाख ५४ हजार ६६७ नोंदणीकृत मतदार ठरवणार आहेत. यामध्ये ४८ लाख २८ हजार १४२ पुरुष आणि ४७ लाख २६ हजार १७८ महिला तसेच ३४७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी दहा हजार ६५२ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांमधून २१ हजार ५२७ मतदान यंत्र, १३ हजार ९६३ बॅटरी आणि १४ हजार ७५५ मतचिठ्ठी यंत्र यांचा समावेश आहे.