रामटेकमध्ये सर्वाधिक नवमतदार

नागपूर, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अठराव्या लोकसभेसाठी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे. मतमोजणी ४ जूनला होणार आहे. लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभेसाठी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नवमतदारांच्या संख्येत वाढ महाराष्ट्रातील रामटेक, […]

रामटेकमध्ये सर्वाधिक नवमतदार

नागपूर, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अठराव्या लोकसभेसाठी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे. मतमोजणी ४ जूनला होणार आहे. लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभेसाठी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

नवमतदारांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडेल. या मतदारसंघांमधील नवमतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील या पाच मतदारसंघांमधील १८-१९ वयोगटाच्या नवमतदारांची संख्या १ लाख ४१ हजार ४५७ एवढी आहे. रामटेकमध्ये सर्वाधिक ३१ हजार ७२५ नवमतदार आहेत.

पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या राज्यात मतदान ?

अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांसह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ – महाराष्ट्र
पहिला टप्पा – मतदान १९ एप्रिल २०२४
रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा विरुद्ध विकास ठाकरे, काँग्रेस विरुद्ध योगीराज लांजेवार, बसप
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा विरुद्ध डॉ. प्रशांत पडोले, काँग्रेस विरुद्ध संजय केवट, वंचित
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित

लोकसभा निवडणूक २०१९ मधील विजेते
रामटेक – कृपाल तुमाने, शिवसेना
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा
चंद्रपूर – सुरेश उर्फ बाळू धानोरकर, काँग्रेस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number