‘पुन्हा एकत्र येणार ही निव्वळ बनवाबनवी’

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुन्हा एकत्र येणार ही निव्वळ बनवाबनवी, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राशपचे अध्यक्ष शरद पवारांचा प्रचार हाणून पाडला. ज्यांना पक्षाच्या ध्येय धोरणांपासून फारकत घ्यायची होती त्यांचा वेगळा पक्ष आहे… आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. वेगळे झालेले भविष्यात पुन्हा एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही; असे अजित पवारांकडून सांगण्यात […]

‘पुन्हा एकत्र येणार ही निव्वळ बनवाबनवी’

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुन्हा एकत्र येणार ही निव्वळ बनवाबनवी, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राशपचे अध्यक्ष शरद पवारांचा प्रचार हाणून पाडला. ज्यांना पक्षाच्या ध्येय धोरणांपासून फारकत घ्यायची होती त्यांचा वेगळा पक्ष आहे… आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. वेगळे झालेले भविष्यात पुन्हा एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही; असे अजित पवारांकडून सांगण्यात आले. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. प्रत्यक्षात दोन स्वतंत्र पक्ष आहेत आणि ते आपापल्या पद्धतीने कार्यरत असल्याचे अजित पवार म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासाकरिता काम करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number