रिझर्व्ह बँकेची कारवाई, दोन बँकांवर निर्बंध

मुंबई, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रात सर्वोदय सहकारी बँकेवर आणि उत्तर प्रदेशमध्ये नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली. दोन्ही बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. सर्वोदय बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेतील कमाल १५ हजार रुपये काढण्याचे निर्बंध घालण्यात आले आहे. नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेतील कमाल १० […]

रिझर्व्ह बँकेची कारवाई, दोन बँकांवर निर्बंध

मुंबई, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रात सर्वोदय सहकारी बँकेवर आणि उत्तर प्रदेशमध्ये नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली. दोन्ही बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. सर्वोदय बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेतील कमाल १५ हजार रुपये काढण्याचे निर्बंध घालण्यात आले आहे. नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेतील कमाल १० हजार रुपये काढण्याचे निर्बंध घालण्यात आले आहे. सर्वोदय सहकारी बँकेवर बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत निर्बंध लागू झाले आहेत. नियमानुसार निर्बंध लागू झालेल्या बँका कोणालाही नवे कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकणार नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number