‘अजून खूप काही बाकी, ही निवडणूक निर्णायक’

नवी दिल्ली, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ जागांवर मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. हे मतदान होण्याआधी रालोआच्या सर्व उमेदवारांना पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवले आहे. प्रत्येक उमेदवाराला तो ज्या राज्यातून निवडणूक लढवत आहे […]

‘अजून खूप काही बाकी, ही निवडणूक निर्णायक’

नवी दिल्ली, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ जागांवर मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. हे मतदान होण्याआधी रालोआच्या सर्व उमेदवारांना पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवले आहे. प्रत्येक उमेदवाराला तो ज्या राज्यातून निवडणूक लढवत आहे त्या राज्यात प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या प्रादेशिक भाषेत लिहिलेले पत्र मोदींनी पाठवले आहे. पत्राद्वारे पंतप्रधान मोदींनी उमेदवाराला जिंकू शकतोस असा विश्वास दिला आहे.

मोदींनी लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही संसदेत पोहोचाल – मोदी
एक सदस्य म्हणून तुम्ही माझ्यासाठी संपत्ती – मोदी
देशहितासाठी एकत्र काम करू – मोदी
मागील १० वर्षात भारतीयांचे जीवन सुखकारक करणारे अनेक निर्णय घेतले – मोदी
अजून बरेच काही करायचे आहे, ही निवडणूक त्यासाठी निर्णायक – मोदी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number