अमरावती, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा, भाजपा विरुद्ध बळवंत वानखेडे, काँग्रेस विरुद्ध प्राजक्ता पिल्लेवान, वंचित अशी लढत आहे. नवनीत राणा यंदा भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीत विजय सोपा व्हावा आणि राजकीय विरोध कमी व्हावा यासाठी नवनीत राणा यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य आणि अडसूळ यांची भेट झाली. या भेटीवेळी झालेल्या चर्चेमुळे राणा दाम्पत्य आणि अडसूळ यांच्यात मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. अभिजीत अडसूळ यांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध होता. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने अडसूळ यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतरच मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आले आहे.