नवी दिल्ली, प्रतिनिधी, दि. १६ एप्रिल २०२४ : लोकसभा निवडणुकीत पैशांचा दुरुपयोग रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४,६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आयाेगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४,६५८ काेटी रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत जप्त केलेला मुद्देमाल जास्त आहे. लाेकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान सुरू हाेण्यापूर्वीच एवढा मुद्देमाल जप्त झाला आहे. लाेदररोज सरासरी १०० कोटी रुपयांची जप्ती होत असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. धक्कादायक म्हणजे, यामध्ये जवळपास ४५ टक्के वाटा हा ड्रग्जचा आहे. कसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक जप्तीची कारवाई यावेळी हाेण्याच्या मार्गावर आहे.