मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२३ मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. लोकसेवा आयोगाने १५९ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर राज्यात पहिला आला. महिला प्रवर्गातून पुणे जिल्ह्यातील आश्लेषा जाधव राज्यात पहिली आली. मागास प्रवर्गातून कोल्हापूरच्या रोहित बेहेरेने पहिला क्रमांक पटकाविला. सविस्तर निकाल आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.