सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना पोलीस कोठडी

मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे दुचाकीवरून आले आणि गोळ्या झाडून पळून गेले होते. या आरोपींना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्यांना पकडण्यासाठी पोलीस तपास सुरू झाला. तपास सुरू झाल्यापासून काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलिसांनी विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांना […]

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना पोलीस कोठडी

मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे दुचाकीवरून आले आणि गोळ्या झाडून पळून गेले होते. या आरोपींना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्यांना पकडण्यासाठी पोलीस तपास सुरू झाला. तपास सुरू झाल्यापासून काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलिसांनी विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक केले आणि मुंबईत न्यायालयात हजर कैले. न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. याआधी पोलिसांनी आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. यामुळे आरोपी २५ एप्रिल पर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत असतील.

सलमानच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबाराच्या सात फैरी झाडल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने कारवाई केली. आरोपींना गुजरातमधील भूज येथेून पकडण्यात आले. पकडलेले दोन्ही आरोपी मूळचे बिहारमधील पश्चिम चंपारणचे रहिवासी आहेत. गोळीबार करणारे मागील १५ – २० दिवसांपासून पनवेलमधील हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये भाड्याने घर घेऊन वास्तव्यास होते. याच काळात त्यांनी चार वेळा सलमानच्या घराची पाहणी केली होती. पनवेलमधून सेकंडहँड दुचाकी घेऊन गोळीबार करणारे त्याच्या घराजवळ आले आणि गोळीबार करून दहशत पसरवून पळून गेले होते. प्राथमिक वृत्तानुसार आरोपींनी लॉरेन्स बिश्नोईचा तुरुंगात असलेला भाऊ अनमोल बिश्नोई याच्या आदेशावरून गोळीबार केला होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number