निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याआधी ऐतिहासिक जप्ती

नवी दिल्ली, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाने मतदारांना भुलवण्यासाठी पैसा, दारू यांचा वापर सुरू असल्याचे आढळल्यास जप्तीची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई प्रत्येक निवडणुकीवेळी केली जाते. पण यंदा निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच ऐतिहासिक जप्ती केली आहे. याआधी कोणत्याही निवडणुकीत […]

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याआधी ऐतिहासिक जप्ती

नवी दिल्ली, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाने मतदारांना भुलवण्यासाठी पैसा, दारू यांचा वापर सुरू असल्याचे आढळल्यास जप्तीची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई प्रत्येक निवडणुकीवेळी केली जाते. पण यंदा निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच ऐतिहासिक जप्ती केली आहे. याआधी कोणत्याही निवडणुकीत एवढी मोठी जप्ती झाली नव्हती.

भारत निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधी ४६५० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीत प्रामुख्याने रोख रक्कम, दारू आणि सोनं यांचा समावेश आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत दररोज सुमारे १०० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. तामीळनाडूतून ५३ कोटी, तेलंगणमधून ४९ कोटी, महाराष्ट्रातून ४० कोटी, कर्नाटक आणि राजस्थानमधून प्रत्येकी ३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण देशातून आतापर्यंत ३९५ कोटींचे ड्रग्ज, ४९० कोटींची दारू, ११४२ कोटींचे मतदारांना वाटण्यासाठी आणलेले सामान जप्त केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number