छिंदवाडा, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या छिंदवाडातील बंगल्यावर पोलीस पोहोचले आहेत. कमलनाथ यांचे स्वीय सचिव आरके मिगलानी यांच्यावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भाजपाचे उमेदवार बंटी साहू यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ही तक्रार आल्यानंतर सुरू केलेल्या तपासाचा भाग म्हणून पोलीस पथक कमलनाथ यांच्या छिंदवाडातील बंगल्यावर पोहोचले आहे. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून बंटी साहू आणि काँग्रेसकडून कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.