परभणी, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मी कुणाला धमकी देणार नाही, कुणाची जमीन खाणार नाही, कुणाला हप्ता मागणार नाही, जर कोणी धमकी दिलीच तर त्याला धमकीनेच जशास तसे उत्तर देऊ, असे म्हणत परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यावर नाव न घेता टीका केली. निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, शेतकऱ्यांना वीज, पाणी, मालाच्या वाहतुकीसाठी दर्जेदार रस्ते या सुविधा पुरवणार असल्याचे जानकर म्हणाले.