छत्रपती संभाजीनर, प्रतिनिधी, दि. १२ एप्रिल २०२४ : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बाजरी, मका, ज्वारी यांसह उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान होऊन ही पिके उध्वस्त झाली. तर दुसरीकडे तालुक्यातील निमखेडी शिवारात वीज पडून एका गायीचा मृत्यू झालाय. सोयगाव सह बनोटी परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच तडाका दिल्यामुळे खरीप पाठोपाठ आता रब्बी आणि उन्हाळी पिके आडवी होऊन भुई सपाट झाल्याच दिसून आलं. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ आर्थिक नुकसान सहन कराव लागत असून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता वर्तवली आहे.