राज्यातील मतदान केंद्रात वाढ

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. राज्यात एकूण ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत. मतदारांची नोंदणी सुरू असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. पु्ण्यातील मतदान केंद्रांची संख्या आठ हजार ३८२ आहे. यानंतर मुंबई उपनगर […]

राज्यातील मतदान केंद्रात वाढ

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. राज्यात एकूण ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत. मतदारांची नोंदणी सुरू असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. पु्ण्यातील मतदान केंद्रांची संख्या आठ हजार ३८२ आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे सात हजार ३८० मतदान केंद्रे असणार आहेत. ठाण्यात सहा हजार ५९२, नाशिकमध्ये चार हजार ८०० आणि नागपूरमध्ये चार हजार ५१० मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये ९१८ आणि गडचिरोलीमध्ये ९५० मतदान केंद्रे असणार आहेत.

यावेळी तीन हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रे सात जिल्हयात आहेत. अहमदनगरमध्ये तीन हजार ७३४, सोलापूरमध्ये तीन हजार ६१७, जळगावमध्ये तीन हजार ५८२, कोल्हापूरमध्ये तीन हजार ३६८, औरंगाबादमध्ये तीन हजार ८५, नांदेडमध्ये तीन हजार ४७ आणि सातारामध्ये तीन हजार २५ मतदान केंद्र असतील.

यावेळी दोन हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रे दहा जिल्हयात आहेत. रायगडमध्ये दोन हजार ७१९, अमरावतीमध्ये दोन हजार ६७२, यवतमाळमध्ये दोन हजार ५३२, मुंबई शहरमध्ये दोन हजार ५१७, सांगलीमध्ये दोन हजार ४४८, बीडमध्ये दोन हजार ३५५, बुलढाण्यामध्ये दोन हजार २६६, पालघरमध्ये दोन हजार २६३, लातूरमध्ये दोन हजार १०२ आणि चंद्रपूरमध्ये दोन हजार ४४ मतदान केंद्र असतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number