उन्हाळी सुट्टीत ४१ मार्गांवर जादा बस

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी, दि. ९ एप्रिल २०२४ : उन्हाळ्याची सुट्टी म्हंटलं की प्रत्येकालाच फिरण्याची ओढ लागते. पण अलोट गर्दीपुढे गाड्या कायमच कमी पडतात आणि मग प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. पण, यंदा उन्हाळी सुट्टीसाठी छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून ४१ मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. या ४१ जादा बसेसमधील सर्वाधिक गाड्या पुण्याकडे सोडण्यात […]

उन्हाळी सुट्टीत ४१ मार्गांवर जादा बस

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी, दि. ९ एप्रिल २०२४ : उन्हाळ्याची सुट्टी म्हंटलं की प्रत्येकालाच फिरण्याची ओढ लागते. पण अलोट गर्दीपुढे गाड्या कायमच कमी पडतात आणि मग प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. पण, यंदा उन्हाळी सुट्टीसाठी छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून ४१ मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.

या ४१ जादा बसेसमधील सर्वाधिक गाड्या पुण्याकडे सोडण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही शहरांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टयांमध्ये दरवर्षी एसटी विभागाच्या वतीने जादा बसची व्यवस्था करण्यात येत असते. उन्हाळी सुट्टयांच्या काळात लग्नाचेही मुहूर्त जास्त असल्याच्या कारणाने एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असते. या काळात नियमित बसमधून प्रवाशांची गर्दी वाढत असल्यामुळे जादा बसचे नियोजन करण्यात येत असते. यंदाही उन्हाळी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number