मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरले. हे सूत्र ठरताच काँग्रसचे राज्यातील काही नेते नाराज झाले आहेत. काँग्रेस राज्यातील १७ जागांवरून निवडणूक लढवणार आहे. पण सांगलीची परंपरागत जागा सोडणार आहे. हा निर्णय जाहीर होताच काँग्रेसच्या मुंबईतील नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय पक्ष आणि महापालिकेवर काही वर्ष सत्ता गाजवणारी काँग्रेस आता मुंबईतून नगण्य जागा लढवणार असेल तर पक्षासाठी हे हिताचे नाही, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे.
सांगलीत विश्वजीत कदम नाराज
वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळापासून सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. पण यावेळी काँग्रेसने सांगलीची जागा शिउबाठाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विश्वजीत कदम नाराज झाले आहेत. त्यांनी संध्याकाळी त्यांचा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.
काँग्रेस (१७ जागा) – नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उत्तर मध्य मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
काँग्रेस मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार
उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढवणार