लोकसभा निवडणूक, पहिल्या टप्प्यात किती उमेदवार ?

नवी दिल्ली, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान पार पडेल. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात असलेल्या १६२५ जणांपैकी २५२ उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पहिल्या टप्प्याच्या उमेदवारांपैकी ४५० जण कोट्यधीश आहेत. बाकी उमेदवारांची […]

लोकसभा निवडणूक, पहिल्या टप्प्यात किती उमेदवार ?

नवी दिल्ली, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान पार पडेल. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात असलेल्या १६२५ जणांपैकी २५२ उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पहिल्या टप्प्याच्या उमेदवारांपैकी ४५० जण कोट्यधीश आहेत. बाकी उमेदवारांची सरासरी संपत्ती साडेचार कोटी रुपये आहे.

ज्या २५२ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांच्यापैकी १६१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांपैकी १५ जण शिक्षा भोगून आले आहेत तर ७ जणांविरोधात हत्येप्रकरणी तर १८ जणांविरोधात महिलांशी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. महिलांशी संबंधित गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांपैकी एका उमेदवाराविरोधात कलम ३७६ अंतर्गत महिलेशी दुष्कर्म केल्याचा गुन्हा दाखल आहे. चिथावणी देणारी भाषणे केल्याप्रकरणी ३५ जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत.

भारतात आचारसंहिता लागू

लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेसाठी देशात सात टप्प्यात मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी सात टप्प्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर ४ जून रोजी होणार आहे. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुरक्षेशी संबंधित आवश्यक ते निर्णय घेतले जात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number