नवी दिल्ली, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसने केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने त्यांचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर राष्ट्रीय नेतृत्वाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठीचे पक्षाचे उमेदवार […]
नवी दिल्ली, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसने केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने त्यांचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर राष्ट्रीय नेतृत्वाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठीचे पक्षाचे उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत.