पुणे, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
मूळची वाशिम जिल्ह्यातील तरुणी अभ्यासाकरिता पुणे जिल्ह्यात आली होती. ती मैत्रीणींसह पुण्यात वास्तव्यास होती. या तरुणीने खोलीचा दरवाजा बंद करून गळफास लावून आत्महत्या केली. मैत्रिणींनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला नाही. आतून आवाज येत नव्हता. अखेर मैत्रीणींनी खोलीची खिडकी उघडून बघितले त्यावेळी तरुणीने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. यामुळे तरुणीचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे.