पंतप्रधान मोदी चंद्रपूरमध्ये

चंद्रपूर, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा चंद्रपूर येथे होत आहे. ही सभा सोमवार ८ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीचा प्रचार करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी पार पडेल आणि मतमोजणी ४ […]

पंतप्रधान मोदी चंद्रपूरमध्ये

चंद्रपूर, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा चंद्रपूर येथे होत आहे. ही सभा सोमवार ८ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीचा प्रचार करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी पार पडेल आणि मतमोजणी ४ जून रोजी होईल. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. रामटेकमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर राजू पारवे निवडणूक लढवत आहेत. इतर चार मतदारसंघांमध्ये भाजपाच्या तिकिटावर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नागपूरमधून नितीन गडकरी, भंडारा – गोंदियातून सुनिल मेंढे, गडचिरोली – चिमूरमधून अशोक नेते, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवत आहेत.

अशी होणार लढत

रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा विरुद्ध विकास ठाकरे, काँग्रेस विरुद्ध योगीराज लांजेवार, बसप
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा विरुद्ध डॉ. प्रशांत पडोले, काँग्रेस विरुद्ध संजय केवट, वंचित
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number