मुंबई, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी खास बातचीत केली. यावेळी पाठिंब्याच्या बदल्यात नव्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदाची मागणी केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाला पाठिंबा देऊ, पण बदल्यात केंद्रीय मंत्रिपद हवं अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात भाजपाने काही नवे मित्र सोबत घेतले आहेत. या नव्या मित्रांमुळे जुन्यांचा विसर पडल्याची खंत आठवलेंनी व्यक्त केली.
मोदींच्या नेतृत्वात लोकसभेच्या निवडणुकीत रालोआचा विजय होईल, महाराष्ट्रात रालोआचा भाग असलेल्या महायुतीला ४५ जागा हमखास मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.