राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार, निरुपम यांचा आरोप

मुंबई , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून बिघाडी झाल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. अशातच शिउबाठाने मुंबईतील त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्त्वासह ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली होती. यानंतर काँग्रेसने निरुपम यांचे पक्षातून निलंबन केले होते. या प्रकारणानंतर आज पुन्हा संजय निरुपम यांनी संजय […]

राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार, निरुपम यांचा आरोप

मुंबई , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून बिघाडी झाल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. अशातच शिउबाठाने मुंबईतील त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्त्वासह ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली होती. यानंतर काँग्रेसने निरुपम यांचे पक्षातून निलंबन केले होते. या प्रकारणानंतर आज पुन्हा संजय निरुपम यांनी संजय राऊत यांना टार्गेट केले आहे.

संजय निरुपम त्यांनी आज (८ एप्रिल २०२४ रोजी ) एक पत्रकार परिषद घेत मुंबईतील खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत असल्याचा आरोप केला आहे.यावेळी निरुपम म्हणाले, संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार आहेत. त्यांनी यामध्ये त्यांची मुलगी, भाऊ आणि साथीदाराच्या नावे लाच घेतली आहे. यामध्ये २९ मे २०२०मध्ये पहिल्यांदा राऊत यांच्या मुलीच्या खात्यावर ३ लाख ५० हजार रूपये आले. यानंतर २६ जून २०२० मध्ये ५ लाखांचे आणि पुढे ७ ऑगस्ट २०२० मध्ये १ लाख २५ हजारांचे पेमेंट आल्याचे आरोप निरुपम यांनी केले आहेत..

त्यानंतर पुढे ते म्हणाले , “आज ईडीने उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अमोल कीर्तीकर यांना समन्स बजावले आहे. खिचडी चोरांवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number