मुंबई , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर २०१२ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फिरोज उर्फ हमजा अब्दुल सय्यदचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झालायचे वृत्त समोर आले आहे. आरोपी सय्यदला कर्करोगाने ग्रासले होते. त्याची प्रकृती खालावल्याने एक महिन्यापूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रविवारी (७ एप्रिल २०२४ रोजी ) दुपारी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
कोण होता सय्यद ?
जंगली महाराज रस्त्यावर एक ऑगस्ट २०१२मध्ये पाच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात एक जण जखमी झाला होता. डेक्कन परिसरातील सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले, तर एक बॉम्ब फुटला नव्हता. तो बॉम्ब शोध व नाशक पथकाने निकामी केला.