‘श्रीकांत शिंदे हेच कल्याणचे उमेदवार’

नागपूर, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कल्याण लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील… भाजपाचा पाठिंबा असेल… मोठ्या मतांनी निवडून आणू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. अद्याप शिवसेनेने कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर […]

‘श्रीकांत शिंदे हेच कल्याणचे उमेदवार’

नागपूर, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कल्याण लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील… भाजपाचा पाठिंबा असेल… मोठ्या मतांनी निवडून आणू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. अद्याप शिवसेनेने कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना लवकरच श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

श्रीकांत शिंदे २०१४ आणि २०१९ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. ते २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले तर हॅटट्रिक करतील. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिउबाठाच्या तिकिटावर वैशाली दरेकर उभ्या आहेत. त्यांनी श्रीकांत शिंदे लढणार असतील तर त्यांची हॅटट्रिक होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारीची घोषणा पक्षाकडून अधिकृतरित्या झाली नसली तरी मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. भाजपाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्यास उत्सुक नाहीत. या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे आव्हान फडणवीस यांच्यापुढे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number