नवी दिल्ली, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या घोषणापत्रात भारतातील ठिकाणं म्हणून न्यूयॉर्क आणि थायलंड येथील छायाचित्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीने भरलेली पुस्तिका असल्याचे भाजपाने सांगितले. काँग्रेसने जी आश्वासने दिली आहे ती अनेक दशके सत्तेत असताना कधीही अंमलात आणली नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण तिथेही ही आश्वासने अंमलात आणलेली नाहीत. यामुळे दिलेली आश्वासने पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचा दावा विरोधकांनी केला.