विश्वजीत कदम आणि नाना पटोलेंमध्ये पत्रयुद्ध

सांगली, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आले आहेत. सांगलीची जागा २०१९ मध्ये काँग्रेसने लढवली होती. आता २०२४ मध्ये पण सांगलीची जागा लढवण्यास उत्सुक असल्याचे संकेत काँग्रेसच्या सांगलीतील नेत्यांनी दिले होते. पण शिउबठाने सांगलीतून परस्पर चंद्रहास पाटील या डबल केसरी विजेत्याला उमेदवारी जाहीर केली. यामुळे मविआत सांगलीवरून वाद […]

विश्वजीत कदम आणि नाना पटोलेंमध्ये पत्रयुद्ध

सांगली, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आले आहेत. सांगलीची जागा २०१९ मध्ये काँग्रेसने लढवली होती. आता २०२४ मध्ये पण सांगलीची जागा लढवण्यास उत्सुक असल्याचे संकेत काँग्रेसच्या सांगलीतील नेत्यांनी दिले होते. पण शिउबठाने सांगलीतून परस्पर चंद्रहास पाटील या डबल केसरी विजेत्याला उमेदवारी जाहीर केली. यामुळे मविआत सांगलीवरून वाद सुरू झाला. सांगलीचे नेते काँग्रेस नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. यानंतर काँग्रेसने शिउबाठाचा उमेदवार जाहीर झाला तरी सांगली लढवण्याचा विचार सुरू केला. पण याच मुद्यावरून कलह सुरू झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगली बाबत ठोस घेणे टाळत आहेत असे सांगलीतील काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. याच कारणामुळे सांगलीचे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या बैठकांवर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेसचेच आणखी एक नेते सतेज पाटील यांनीही काँग्रेस श्रेष्ठींकडे दिल्लीत जाऊन नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सांगलीचे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्यात पत्रयुद्ध सुरू झाले आहे.

सांगलीच्या तिढ्यामुळे काँग्रेस अस्वस्थ

सांगलीच्या तिढ्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. नाना पटोले यांना दिल्लीतून तातडीचे बोलावणे आल्याचे समजते. गोंदियाची सभा मध्येच सोडत नाना दिल्लीला रवाना झाले आहेत.

सांगलीच्या तिढ्यामुळे काँग्रेस अस्वस्थ
नाना पटोलेंना दिल्लीश्वरांचे बोलावणे
गोंदियाची सभा मध्येच सोडत नाना दिल्लीला रवाना

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number