राष्ट्रवादीला साताऱ्यात उमेदवार मिळेना ?

पुणे, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहेत. पण राष्ट्रवादीने सातारा, बारामती या अनेकांचे लक्ष असलेल्या मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. सातारा मतदारसंघ भाजपाकडे जाणार ? महायुतीच्यावतीने सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी यावेळी भारतीय जनता पार्टी लढवणार असल्याची चर्चा आहे. भाजपाकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना […]

राष्ट्रवादीला साताऱ्यात उमेदवार मिळेना ?

पुणे, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहेत. पण राष्ट्रवादीने सातारा, बारामती या अनेकांचे लक्ष असलेल्या मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

सातारा मतदारसंघ भाजपाकडे जाणार ?

महायुतीच्यावतीने सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी यावेळी भारतीय जनता पार्टी लढवणार असल्याची चर्चा आहे. भाजपाकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अद्याप कोणत्याही मोठ्या पक्षाने सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेले तीन उमेदवार
१. परभणी – महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस (मतदान २६ एप्रिल २०२४)
२. रायगड – सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (मतदान ७ मे २०२४)
३. शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (मतदान १३ मे २०२४)

अशा होणार लढती

१. परभणी – महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध संजय जाधव, शिउबाठा विरुद्ध हरिभाऊ शेळके, ओबीसी बहुजन
२. रायगड – सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अनंत गीते, शिउबाठा
३. शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप

राशपलाही साताऱ्यात उमेदवार मिळेना

राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच राशपनेही सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. आधी शरद पवार यांचे समर्थक श्रीनिवास पाटील साताऱ्याचे खासदार होते. पण यावेळी त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवू शकणार नसल्याचे जाहीर केले आहे. ही घोषणा होऊन २४ तास उलटले तरी राशपने सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number