मनसे लोकसभा लढवणार नाही ?

मुंबई, २९ मार्च २०२४ प्रतिनिधी : मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे सूत्रांकडून समजते. मनसेने २०१४ मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेविरोधात उमेदवार उभे केले होते. पण २०१९ मध्ये मनसेने लोकसभेची निवडणूक लढवणे टाळले होते. निवडक सभा घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रदान मोदी आणि भाजपाच्या नेत्यांचा जाहीरपणे विरोध केला होता. पण लोकसभेच्या २०२४ च्या […]

मनसे लोकसभा लढवणार नाही ?

मुंबई, २९ मार्च २०२४ प्रतिनिधी : मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे सूत्रांकडून समजते. मनसेने २०१४ मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेविरोधात उमेदवार उभे केले होते. पण २०१९ मध्ये मनसेने लोकसभेची निवडणूक लढवणे टाळले होते. निवडक सभा घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रदान मोदी आणि भाजपाच्या नेत्यांचा जाहीरपणे विरोध केला होता. पण लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी मनसेने नवा पवित्रा घेतला आहे. मनसेने महायुतीशी सामंजस्य साधले आहे. यावेळी मनसे लोकसभेची निवडणूक लढवण्याऐवजी राज्यसभेत एखादी जागा आणि विधानसभेत महायुतीकडून किमान दहा जागा लढवण्याच्या विचारात असल्याचे समजते. अर्थात मनसेने अद्याप त्यांचा निर्णय जाहीर केलेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number