शिउबाठाच्या यादीमुळे मविआत नाराजी

मुंबई, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाने राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. ही यादी जाहीर होताच महाविकास आघाडीतील नाराजी उघड होण्यास सुरुवात झाली आहे. सांगली आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारीवरून काँग्रेस आणि शिउबाठा यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. राशपने पण शिउबाठाच्या घोषणेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात […]

शिउबाठाच्या यादीमुळे मविआत नाराजी

मुंबई, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाने राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. ही यादी जाहीर होताच महाविकास आघाडीतील नाराजी उघड होण्यास सुरुवात झाली आहे. सांगली आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारीवरून काँग्रेस आणि शिउबाठा यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. राशपने पण शिउबाठाच्या घोषणेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राशपच्या जितेंद्र आव्हाड यांनी शिउबाठाची यादी जाहीर होताच नाराजी व्यक्त केली आहे. आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन उमेदवारी जाहीर करणे अपेक्षित होते. पण तसे झालेले नाही; अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव यांनी सांगलीत सभा घेऊन सांगलीचा पक्षाचा उमेदवार कोण असेल हे जाहीर केले होते. उद्धव यांच्या घोषणेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतरही शिउबाठाने सांगलीतून जाहीर केल्याप्रमाणे डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर काँग्रेसचे राज्यातील नेते शिउबाठाबाबतची नाराजी व्यक्त करण्यात दिल्लीला रवाना झाले आहेत.

शिउबाठाच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी

१) बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
२) यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
३) मावळ संजोग वाघेरे पाटील
४)सांगली – चंद्रहार पाटील
५) हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
६)छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
७)धाराशीव – ओमराजे निंबाळकर
८) शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे
९) नाशिक – राजाभाऊ वाजे
१०) रायगड – अनंत गीते
११) सिंधुदुर्ग – रत्नागिरी – विनायक राऊत
१२) ठाणे – राजन विचारे
१३) मुंबई – ईशान्य – संजय दिना पाटील
१४) मुंबई – दक्षिण – अरविंद सावंत
१५) मुंबई – वायव्य – अमोल कीर्तिकर
१६) परभणी – संजय जाधव
१७) मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number