पुणे, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : धुलिवंदनानिमित्त सोमवार २५ मार्च २०२४ रोजी पुणे आणि नवी मुंबई या दोन्ही मेट्रो सेवा सकाळी सहा ते दुपारी दोन या वेळेत बंद राहतील. दुपारी दोन वाजल्यापासून रात्रीपर्यंत पुणे आणि नवी मुंबई या दोन्ही मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत.
पुणे मेट्रो सेवा सोमवार २५ मार्च रोजी दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत सुरू असेल. तसेच नवी मुंबई मेट्रो सेवा सोमवार २५ मार्च रोजी दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत सुरू असेल.