छत्रपती संभाजीनगर, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी येथे मध्यरात्री तीन दुकानाला आग लागून दुकाने आगीत भस्मसात झाली आहेत. रात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक एका दुकानाला आग लागली. आग हळूहळू तीन दुकानांमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी घाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये एक दुकान फोटो फ्रेमचे, फर्निचरचे दुकान आणि एक गादी घर जळून खाक झाले आहे. प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. यामध्ये तीनही दुकानांमधील साहित्य जाळून खाक झाल्याने दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.