नवी दिल्ली, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : दिल्ली दारू घोटाळा आणि ईडी अधिकाऱ्यांच्या हेरगिरी प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. केजरीवाल यांच्या घरातून ईडीने १५० पानांची फाईल जप्त केली आहे. या फायलीत ईडीच्या अधिकाऱ्यांशी माहिती असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने ईडीची हेरगिरी करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे. यामुळे या प्रकारात केजरीवाल अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
केजरीवाल यांच्यावर आरोप
दारू घोटाळ्यातून अबकारी कराऐवजी आपसाठी निधी संकलन
दारू घोटाळ्यात केजरीवाल, सिसोदिया, के. कविता यांचा हात
केजरीवाल दारू धोरण ठरवण्यात सहभागी
दारू धोरणाचे सूत्रधार केजरीवाल
गोवा निवडणुकीसाठी पैशांचा वापर
निवडक लोकांना झाला लाभ
हवालाद्वारे गोव्याला पाठवले ४५ कोटी रुपये
केजरीवालांनी केली ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी, सूत्रांची माहिती
केजरीवालांच्या घरातून १५० पानी फाईल जप्त
फायलीत ईडी अधिकाऱ्यांची माहिती, सूत्रांची माहिती
हेरगिरी प्रकरणी केजरीवाल अडचणीत सापडण्याची शक्यता