पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशपचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार लक्ष केले आहे. राज्यात दूध घोटाळा झाल्याचे सांगत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा – रोहित पवार
आश्रम शाळेत एकूण १ लाख ८७ हजार विध्यार्थी शिकत आहेत – रोहित पवार
घोटाळ्याच्या ११ फाईली अज्ञात व्यक्तीने दिल्या – रोहित पवार
सर्व फाईलींचा मी बारकाईने अभ्यास केला – रोहित पवार
कदाचित सत्तेत असलेल्या नेत्यानेच फाईली पाठवल्या – रोहित पवार
तब्बल ८० कोटी दलालीसाठी दिले – रोहित पवार
सरकार याची चौकशी करणार का? – रोहित पवार
दुसरा घोटाळा समाजकल्याण विभागाचा आहे – रोहित पवार
यामध्ये सरकारने २५ टक्के दलाली घेतली – रोहित पवार
स्वच्छता काम करणाऱ्या कंपनीला आता आहार देण्याचं काम दिले – रोहित पवार
साताऱ्यातील कैलास किराणा कंपनीवर देखील आरोप – रोहित पवार
हे सरकार दलाली सरकार आहे – रोहित पवार
अंगणवाडी सेविकांना, शेतकऱ्यांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आणि कंपनींना दलाली देण्यासाठी पैसा आहे – रोहित पवार