पुणे, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : वसंत मोरे यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती फेसबुक पोस्ट करत दिली होती. यामुळे मोरे लोकसभा लढणार हे ठरल्याचं दिसून आलं. परंतु कोणत्याही पक्षासोबत जाणार की स्वतंत्र लढणार हे ठरलं नव्हत. अशातच काहीही झालं तरी पुणे लोकसभेची निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही. असा भाजपाच्या नेत्यांना इशारा देत मोरे यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. यावेळी माझ्याच पक्षातील काही लोक माझ्या वाटेत काटे टाकत आहेत असा आरोप देखील मोरे यांनी मनसेच्या पुणे शहरातील नेत्यांवर केला आहे.
रवींद्र धंगेकर माझे मित्र असले तरीही मी निवडणूक लढवणार आहे. कारण ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं म्हणत मोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या सगळ्यावरून पुणे लोकसभा निवडणूक मोरे अपक्ष लढणार असल्याची स्पष्ट झाले आहे.