रोहित पवार यांच खोचक ट्विट

मुंबई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरून रोहित पवार यांनी भाजपसह अजित पवार यांना टोला लगावला आहे. आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे ४०-४० आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत […]

रोहित पवार यांच खोचक ट्विट

मुंबई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरून रोहित पवार यांनी भाजपसह अजित पवार यांना टोला लगावला आहे. आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे ४०-४० आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे १-१ आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय असे म्हणत राशपचे खासदार रोहित पवार यांनी भाजपासह मित्रपक्षाला लक्ष केले आहे.

राशप खासदार पवार म्हणाले, असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातले मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात. असो! असं म्हणत या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीत आधीच शिकार झालेले मोठे पक्ष नया है वह असेच म्हणत असतील अशा शब्दात खासदार पवार यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number