नवी दिल्ली, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी फोनवरून बातमीत केली. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन करत मोदींनी पुतिन यांच्याशी भारत – रशिया संबंध आणि इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा केली. यानंतर मोदींनी झेलेंस्की यांच्याशी चर्चा केली. भारत – युक्रेन मैत्री आणखी वृद्धींगत व्हावी यासाठी करायच्या प्रयत्नांवर यावेळी चर्चा झाली. लोकसभेसाठी प्रचारात गुंतलेल्या मोदींचा भारताचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध सुधारण्याकडेही लक्ष आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी २१ मार्च रोजी भूतानच्या दौऱ्यावर जाणार आहेत.