पुणे, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : होळीनिमित्त उत्तर भारतासाठी पुण्यातून सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुण्यातून पुणे ते गोरखपूर सुपरफास्ट विशेष रेल्वे २२ मार्चला सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी सुटते आणि ती दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता गोरखपूरला पोहोचेल. होळीसाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवासी संख्या मोठी असते यामुळे रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे होळीनिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.