प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला नवा प्रस्ताव

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले आहे. पत्राद्वारे वंचितने काँग्रेसला महाराष्ट्रातील सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. शिउबाठा आणि राशप वंचितच्या मागण्या ऐकून घेण्यास उत्सुक दिसत नाहीत. पण वंचितला भाजपा सरकारला पराभूत करायचे आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रातील […]

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला नवा प्रस्ताव

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले आहे. पत्राद्वारे वंचितने काँग्रेसला महाराष्ट्रातील सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. शिउबाठा आणि राशप वंचितच्या मागण्या ऐकून घेण्यास उत्सुक दिसत नाहीत. पण वंचितला भाजपा सरकारला पराभूत करायचे आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रातील सात जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी पूर्ण पाठिंबा देणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यासाठी त्यांनी काँग्रेसला त्यांचे कोणतेही सात मतदारसंघ कळवण्याचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number