साताऱ्यातून उदयनराजे लोकसभेसाठी रिंगणात ?

सातारा, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. या संदर्भात त्यांनी भाजपाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. राज्यातील लोकसभा उमेदवारांविषयीचे निर्णय घेण्यासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाने समिती स्थापन केली आहे. या समितीने दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली. यानंतर राज्यातील भाजपाच्या २० उमेदवारांची यादी जाहीर झाली. इतर उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार […]

साताऱ्यातून उदयनराजे लोकसभेसाठी रिंगणात ?

सातारा, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. या संदर्भात त्यांनी भाजपाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.

राज्यातील लोकसभा उमेदवारांविषयीचे निर्णय घेण्यासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाने समिती स्थापन केली आहे. या समितीने दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली. यानंतर राज्यातील भाजपाच्या २० उमेदवारांची यादी जाहीर झाली. इतर उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. याच मुद्यावर चर्चेसाठी फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांच्या व्यतिरिक्त शिवेंद्रराजेंची पण भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांशी बंद दाराआड लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा केली.

महाजनांनी घेतली उदयराजे, शिवेंद्रराजेंची भेट
साताऱ्यातून उदयनराजे लोकसभेसाठी इच्छुक
महाजनांची शिवेंद्रराजेंसोबत बंद दाराआड चर्चा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number