मुंबई मनपाच्या आयुक्तांची बदली

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही बदली झाली आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. पण चहल यांची बदली झाली नव्हती. याच […]

मुंबई मनपाच्या आयुक्तांची बदली

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही बदली झाली आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. पण चहल यांची बदली झाली नव्हती. याच कारणामुळे चहल यांची बदली करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. चहल आता कोणत्या विभागात काम करणार आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी कोण सांभाळणार हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number