शिवाजी पार्कवर राहुल यांची सभा

मुंबई, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे.सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास राहुल यांची ही सभा होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही […]

शिवाजी पार्कवर राहुल यांची सभा


मुंबई, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे.
सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास राहुल यांची ही सभा होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही उपस्थित राहणार आहेत. प्रियांका गांधी या शनिवारीच मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यांनी राहुल यांच्यासह चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. या सभेला मोदी विरोधात आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची ही पहिलीच सभा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number