लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते

अमरावती, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या विकासासाठी घेतल्याचे जाहीर केले आहे. युवा स्वाभिमानी पक्षाच्या मेळाव्यात या विषयीचा निर्णय घेण्यात आला. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी यावेळी केलं. युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या खासदार […]

लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते

अमरावती, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या विकासासाठी घेतल्याचे जाहीर केले आहे. युवा स्वाभिमानी पक्षाच्या मेळाव्यात या विषयीचा निर्णय घेण्यात आला. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी यावेळी केलं.

युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या खासदार नवनीत राणा यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्धार व्यक्त करत एनडीए त्यांच्या विषयी जो निर्णय घेईल, तो राणा दाम्पत्याला मान्य असेल असाच ठराव युवा स्वाभिमान च्या मेळाव्यात घेण्यात आला.

नवनीत राणा यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसुळ यांना तिकिट मिळते की, नाही हे पाहण्यासारखे ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number