ललित पाटीलसह १४ जणांविरोधात तीन हजार पानी आरोपपत्र

पुणे, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहेत. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालायात हे आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र तीन हजार १५० पानी आहे. आरोपपत्रातून पोलिसांनी महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. अमली पदार्थ तस्करीचा मुख्य सूत्रधार […]

ललित पाटीलसह १४ जणांविरोधात तीन हजार पानी आरोपपत्र

पुणे, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहेत. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालायात हे आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र तीन हजार १५० पानी आहे. आरोपपत्रातून पोलिसांनी महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.

अमली पदार्थ तस्करीचा मुख्य सूत्रधार ललित अनिल पाटील अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे, अमित जानकी सहा उर्फ सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण अनिल पाटील, अभिषेक विलास बलकवडे, प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित मोहिरे, जिशान इक्बाल शेख, शिवाजी अंबादास शिंदे, रेहान उर्फ गोल आलम सुलतान मोहम्मद अन्सारी, राहुल पंडीत उर्फ रोहित कुमार चौधरी उर्फ अमित कुमार, समाधान बाबुराव कांबळे, इम्रान शेख उर्फ अमिर आतिक खान, हरिश्चंद्र उरवादत्त पंत अशी आरोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number