नवी दिल्ली, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात केसीआरच्या मुलीला ईडी कोठडी देण्यात आली आहे. तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविताला २३ मार्च २०२४ पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. भारत राष्ट्र समितीची मुलगी आणि तेलंगण सरकारची माजी मंत्री के. कविताला दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी २३ मार्च पर्यंत ईडी कोठडी दिली आहे. दिल्ली सरकारने दारू विक्रीचे परवाने देण्यासाठी नवे धोरण तयार केले. हे धोरण अंमलात आणले त्यावेळी विशिष्ट व्यक्ती आणि आस्थापनांना परवाने देताना लाच घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा अब्जावधी रुपयांचा घोटाळा असून यातली मोठी रक्कम के. कविताला मिळाल्याचा आरोप होत आहे. याच प्रकरणात ईडीने के. कविताला अटक केली. न्यायादंडाधिकाऱ्यांनी के. कविताला २३ मार्च २०२४ पर्यंत ईडी कोठडी दिली.