मुंबई, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : आचारसंहितेआधी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातील जनतेला दिलासा देणारे निर्णय होण्याची शक्यता आहे. देशभरात शुक्रवारपासून पेट्रोल आणि डिझेल प्रती लिटर दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. राज्य शासन इंधनावरील करात कपात करून महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त करण्याची शक्यता आहे. शेतकरी, कष्टकरी, गरीबांच्या हितासाठी तसेच महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी निर्णय घेतले जाण्याचीही शक्यता आहे. यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष आहे.