मुंबई, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे जागावाटप अजूनही निश्चित झालेले नसले तरी लवकरच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १३ जागा शिवसेनेच्या वाट्याला तर ४ जागा राष्ट्रवादीला मिळणार असं सध्या तरी बोललं जातं आहे. तर भाजपा ३१ जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी यादी जाहीर होणार असल्याची माहिती जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.