पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली, दि. १४ मार्च, २०२४ – लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात करण्यात आली आहे. एलपीजी आणि सीएनजीच्या किमतींमध्ये नुकत्याच झालेल्या कपातीमुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पेट्रोल आणि […]

पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली, दि. १४ मार्च, २०२४ – लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात करण्यात आली आहे. एलपीजी आणि सीएनजीच्या किमतींमध्ये नुकत्याच झालेल्या कपातीमुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २ रुपयांनी कमी करून, कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.

देशभरातले पेट्रोल, डिझेल दर २ रुपयांनी उतरले, शुक्रवार १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजल्यापासून नवे दरपत्रक लागू

मुंबईत शुक्रवारपासून १०४.२५ रुपयांत मिळेल पेट्रोल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number