चरस तस्करी करणारा आरोपी अटकेत

प्रतिनिधी, मुंबई, दि. १३ मार्च २०२४ : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा चार कडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परराज्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातून सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल दोन कोटी रुपये किंमतीचे चरस जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ७ किलो ४० ग्रॅम वजनाचा […]

चरस तस्करी करणारा आरोपी अटकेत

प्रतिनिधी, मुंबई, दि. १३ मार्च २०२४ : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा चार कडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परराज्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातून सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल दोन कोटी रुपये किंमतीचे चरस जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ७ किलो ४० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे किंमत २ करोड, ११ लाख रुपये इतकी आहे. आरोपीने हा अंमली पदार्थ बिहार राज्यामधून आणल्याचे सांगितले. या संदर्भात कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे येथे गुन्हा नोद केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number