नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार आहेत. ते कोणत्या विषयावर बोलणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याबाबत मोदी घोषणा करण्याची शक्यता आहे.
याआधी पंतप्रधानांनी नोटाबंदी, कोविड काळात लॉकडाऊन आणि लसीकरण मोहीम तसेच कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा करण्यासाठी जनतेशी संवाद साधला होता. कोरोना काळात अधूनमधून पंतप्रधान जनतेशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेत होते. कोरोना संकटाशी लढताना आपण सगळे एकत्र आहोत आणि एकच राहणार याची जाणीन पंतप्रधान मोदी संवादाच्या माध्यमातून करून देत होते. यामुळे यावेळी पंतप्रधान काय बोलणार आहेत यावरून चर्चेला उधाण आले आहे.