नागपूर, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचा बँड वाजला आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूर येथे बोलत होते. जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. महायुतीमधील मित्र पक्षांचा जागावाटप करताना सन्मान राखला जाईल. जागावाटप झाले की, अधिकृत घोषणा करू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गडकरींना उमेदवारी देण्याची तयारी शिउबाठाच्या उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे. या संदर्भात प्रश्न विचारल्यावर शिउबाठाचा बँड वाजला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यांचा बँड वाजला आहे ते गडकरींना उमेदवारी देण्याची तयारी दाखवत आहेत, असेही फडणवीस म्हणाले. उद्धव यांची ऑफर म्हणजे गल्लीतल्या नेत्याने अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारीची ऑफर देण्यासारखे असल्याचे फडणवीस उपहासाने म्हणाले.
‘शिउबाठाचा बॅन्ड वाजला आहे’
‘ज्याचा बॅन्ड वाजलाय ते गडकरींना ऑफर देत आहेत’
फडणवीसांचा उद्धव यांच्यावर निशाणा